श्री सोमेश्वर माझा बातमी इम्पॅक्ट..! सोमाणी ह्युंदाई बारामती च्या Dse गणेश शिंदे यांनी डिसेंबर महिन्यात विकल्या तब्बल रेकॉर्ड ब्रेक २१ गाड्या..!
बारामती
फोर व्हिलर गाडी खरेदी करण्यासाठी डिसेंबर सर्वोत्तम या बातमीवर शिक्कामोर्तब,श्री सोमेश्वर माझा बातमी Impact..!

बारामती येथील सोमाणी ह्युंदाई शोरूम बारामती तील अधिकृत ह्युंदाई गाडयांची नामांकित डीलरशिप आहे. बारामती चे मा नगराध्यक्ष सुभाषशेठ सोमाणी आणि बंधू यांनी २०११ साली हे शोरूम चालू केले.सुरुवातीपासून च या शोरूम ची जबाबदारी त्यांनी त्यांचे पुतणे केतन सोमाणी यांचेकडे सोपावली होती. राजस्थान महावस्त्र दालन याबरोबर सुभाष सोमाणी यांनी काळाची गरज ओळखून आपल्या पारंपारिक कापड उदयगाबरॊबर द्वाराकादास शामकुमार, पुणे टेक्स्टटाईल मार्केट, कमल बजाज, सहा जिल्ह्यांची टाटा spare पार्ट ची डिलरशिप, डिश टीव्ही ची डीलरशिप यासारख्या अनेक उद्योग उभे करून अकलूज याठिकाणी शेती घेऊन शेतीही आजतगायत यशस्वीपणे करून दाखवली आणियाबरोबर राजकारणात एंन्ट्री करून पहिल्याच पंचवार्षिक मध्ये बारामतीचे नगराध्यक्ष बहुमान ही मिळवला. यामध्ये त्यांना त्यांचे बंधू सुशील सोमाणी आणि महेश सोमाणी मदत करतात. याबरोबर पुण्यात एक बंधू नामांकित बांधकाम व्यवसायिक आहेत. सुभाष सोमाणी यांच्या वडिलांनी सुरुवातीला बारामती मध्ये गाड्यावर कपडे विकन्यास सुरुवात करून राजस्थान दालनाला वलयं प्राप्त करून दिले. त्यांचीच री ओढत आता तिसऱ्या पिढीमध्ये केतन सोमाणी आणि त्यांचे बंधू हे व्यवसाय अगदीच सोमाणी उद्योगसमूह मोठ्या दौलात उभा राहून कात टाकत आहे.एकाच उद्योगावर अवलंबून न राहता एकास एक उद्योग कसे उभे करून यशस्वी करून दाखवायचे हे सोमाणी ग्रुप कडून शिकवयास मिळते.शेकडो – हजारो तरुणांना या माध्यमातून हाताला आणि पोटाला काम देणारा हा उद्योगसमूह, कित्येक कामगार हे यांच्याकडे कामाला आल्यानंतर कदाचित दुसरीकडे जातच नाहीत. कित्येक कर्मचारी शोरूम उभे केल्यापासून अजूनही तिथेच आहेत आणि स्तिरस्तावर झाल्याचे आपणांस पाहवयास मिळते..!

कित्येक कर्मचारी यांनी इथेच काम करून ह्युंदाई कंपनीच्या नव्या गाड्या घेतल्या आहेत. नावे सांगायची झाल्यास हि यादी खूप मोठी होईल. कदाचित बारामतीतील फक्त माझ्या माहितीप्रमाणे याचं शोरूम मध्ये काम करून याचं कंपनीच्या गाड्या घेणारे कर्मचारी फक्त सोमाणी ह्युंदाई मधेच आढळतील. याबरोबर काहींनी फ्लॅट तर काहींनी बारामती मध्ये जागा घेतलेल्या आहेत.

कदाचित हेही या ग्रुप ची आणि कर्मचारी यांची प्रगती कशाप्रकारे झाली आहे हे दर्शवतात. हे सर्व शक्य झाले केतन सोमाणी आणि मॅनॅजमेन्ट मुळे, मी ही या ग्रुप चा EX कर्मचारी असल्याचा अभिमान मला नेहमीच राहिला आहे आणि राहिलंही. कारण तेथील कर्मचारी यांना मिळणारी वागणूक व फ्रॅंकेली- फ्रेंडली वातावरण आहे. एखाद्या ग्रुप ची प्रगती त्यांच्या कर्मचारी यांच्या प्रगतीवर ही ठरत असते..!

असाच २०११ पासून अर्थात सोमाणी ह्युंदाई शोरूम चालू झाल्यापासून अगदी त्याचा प्रामाणिकपणा हा त्याचा विशेष गुण असा गणेश शिंदे DSE म्हणून काम करत असताना, हे त्याच्या आयुष्यात घडत असताना तो कित्येक वेळा खचला परंतु त्याने जिद्द सोडली नाही याचा परिपाक म्हणजे डिसेंबर २०२५ मध्ये पट्ठ्याने रेकॉर्डब्रेक तब्बल २१ गाड्या न भूतो न भविष्यती फोर व्हिलर विकल्या. विशेष म्हणजे त्याने सहा महिन्याचे टार्गेट एका महिन्यात अचिव्ह केले आहे.याआधी २०१३ साली आता सोमाणी ह्युंदाई चे सेल्स मॅनेजर असणारे विजय बांदल यांनी वीस गाड्या विकल्या होत्या. यानंतर तब्बल बारा वर्षांनी गणेश शिंदे याने इतक तगड comoitition, मार्केट मध्ये एवढे पर्याय उपलब्ध असताना २१ गाड्या विकण्याची किमया केली आहे. बारामती नव्हे तर पुणे जिल्ह्यात देखील एका DSE ने २१ गाड्या विकण्याची ही पहिलीच घटना असावी.यासाठी त्याला श्री सोमेश्वर माझा च्या वेळोवेळीच्या बातम्याचा उपयोग झाला असे तो अवरजून सांगतो. २१ गाड्या विकणे हे एका सात आठ DSE असणाऱ्या टीम ला किंव्हा एखाद्या तालुका लेवल असणाऱ्या आउटलेट ला टार्गेट असते ते त्याने एकट्याने करून दाखवले, त्याचे अभिनंदन..!

श्री सोमेश्वर माझा ची सुरुवात ही ह्युंडाई क्रेटा इलेक्ट्रिक या गाडीच्या लौचिंग च्या बातमी ने मी केली जानेवारी २०२५ मध्ये केली होती आणि डिसेंबर बंपर ऑफर च्या बातमी ने आणि गणेश शिंदे यांनी डिसेंबर २५ मध्ये विकलेल्या २१ गाड्याने शेवट केला.श्री सोमेश्वर माझा ची बातमी म्हणजे, *IMPACT_करणारी_बातमी* ही बिरूदावली सोमेश्वर माझा ला एका वर्षात मिळाल्याचे समाधान वाटते. श्री सोमेश्वर माझा च्या बातम्यांचा परिणाम टप्प्याटप्प्याने या वर्षात प्रकाशित होतील. गेल्या वर्षभरात श्री सोमेश्वर माझा टीमला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार यनिमित्ताने मानतो..!
यामध्ये अगदी पत्रकारिता पदवी ज्यांच्यामुळे घेतली ते डॉ सौरभ काकडे (ज्यांच्या प्रेरणेपासून मी हे धारिष्ठ दाखवू शकलो- हे शिवधनुष्य लिलया पेलू शकलो असे डॉक्टर), प्रमोदकाका काकडे फौंडेशन, वेळोवेळी प्रोत्साहन देणारे अभिजितभैया काकडे ( भैया तुम्ही दिलेली जबाबदारी यशस्वीपणे म्हणण्यापेक्षा तुमची इच्छा एका वर्षात पूर्ण केली आहे.) कार्यकारी संपादक गणेश फरांदे, श्री हेमंत निंबाळकर,ब्रम्हचैतन्य मित्र परिवार गणेश मगर-इंद्रजित काकडे-गणेश जावळे, विक्रम काकडे-अमर काकडे-अमोल लकडे-अमोल काकडे-विनोद निकाळजे-योगेश काकडे, माझी सौभाग्यवती मुख्य संपादिका सौ प्रियांका चंद्रजित काकडे याबरोबर पुरंदर रिपोर्टर चे विजय ऊर्फ नाना लकडे आणि Mnews मराठी चे मधुकर बनसोडे,
पत्रकारिता गुरु last but not the least,Adv शिंदे ( The Great Human Being ) यासह सर्व द्यात-अज्ञात मित्र परिवार व गुरुजणांचे शतशः आभार..!

*टीम श्री सोमेश्वर माझा*
✍️चंद्रजित काकडे
