*चौधरवाडी जि प शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..!*
सोमेश्वर मंदिर
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका,कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती . ३ जानेवारी १८३१ ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या सावित्रीबाईचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले-यांच्यासोबत झाला. ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्तव.लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षणास सुरुवात केली.स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
चौधरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शालेय व्यवस्थापान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला..!

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बालगुडे एस बी मॅडम,सौ खामकर एस एस मॅडम,मूल्यवर्धन चे मार्गदर्शक सावळकर सर, आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ व शालेय विध्यार्थी हे उपस्थित होते..!
