प्रमोदकाका काकडे यांना पालकत्व फौंडेशन पुणे, २०२६ चा राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार जाहीर..!

0
FB_IMG_1767237996980
Spread the love

निंबुत,बारामती

प्रमोदकाका यांच्या शब्दात त्यांचा जीवनप्रवास थोडक्यात..!

काकांचे शिक्षण पाचगणी,कोल्हापूर व पुणे याठिकाणी झाले. शिवाजी विद्यापीठाचा काका पदवीधर आहे. याबरोबर कोल्हापुरात पैलवानकीचे त्यांनी धडेही गिरवले आहेत.राजकारण करत असताना समाजकारण करून, गोरगरिबांना मदत करणे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून वैयक्तिक नातेसंबंध जोपासणे . घरची शेती सांभाळत, शेतीकडे दुर्लक्ष न करता हे सर्व कशा प्रकारे करायचे याचाही परिपाठ वडिल पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य असताना हे आई वडिलांचे विशेष संस्कार झाले असे काका आवर्जून सांगतात. घरी शेतीत ऊसशेती अधिक प्रमाणात असल्याने घरचे उसाचे मोठे आणि प्रसिद्ध गुऱ्हाळ होते हा शेतीबरोबरचा त्यांचा हा जोडधंदा ही होता..!*

काका या आठवणी सांगताना कुटुंबातील आईवडिलांचा प्रभाव माझ्यावर जास्त राहिला.वडील कडक स्वभावाचे तर आई कुटुंबवत्सल होती..! सकुंडे गुरुजी यांचा प्रभाव जास्त आहे, अप्पासाहेब जगताप आणि वस्ताद मोहम्मद हनीफ यांचा सर्वात जास्त प्रभाव माझ्या आयुष्यावर आहे असे सांगतात.

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठित सहकारमहर्षी साहेबरावदादा काकडे देशमुख राजकीय घराण्यात जन्म झाला असल्यानं आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती मजबूत होती. सहकार आणि राजकारण व कृषी क्षेत्रात अग्रेसर असणारे आमचे राजकीय कुटुंब.माझे वडील अर्थात दादा स्वतः पैलवान होते आणि त्यांना कुस्ती व बैलगाडी शर्यत यांची लहानपणापासून आवड होती व ती त्यांनी जोपासली होती. पश्चिम महाराष्ट्रात दादांच्या भोवती राजकीय व्यक्तींची नेहमीच गर्दी असायची.पुणे, सातारा,सांगली आणि कोल्हापूर भागात दादांचे प्रचंड राजकीय आणि सामाजिक वजन होते. पै पाहुणे यांच्याबरोबर दादानी या भागात जिवाभावाची माणसं जोडली होती. दादा बैलगाडी शर्यत किंवा लग्न कार्यक्रम साठी सातारा, सांगली, कोल्हापूर भागात गेले तर चार चार दिवस त्यांचा पाहुणचार चालत असे. त्यामुळे घरची शेती व गुऱ्हाळ, मुले आणि शेतगडी त्यांची कुटुंबे दादांच्या मागे माझी आई स्व प्रभावतीआक्का सांभाळायची आम्ही सर्व भावंडे याकामी आमच्या आईला त्यावेळी मदत करू लागायचो. माझे शिक्षणाबाबत दादा आणि अक्का यांनी मला सुरवातीला शालेय शिक्षणासाठी पाचगणी व पुणे येथे ठेवले तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूर येथे ठेवले.भगवानदादांनी पैलवान होण्यासाठी, पैलवानकी करण्यासाठी कोल्हापूर ला ठेवले याबरोबर दादांचा कुस्त्या करण्यासाठी ही आग्रह असायचा..!

घरात जन्मजात राजकीय पार्श्वभूमी असल्याने मुलांना यापासून लांब ठेवायचे होते त्यामुळे मुले लहान असताना च ठरवले होते एकाला डॉक्टर आणि दुसरा वकिल करायचे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे. सोमेश्वरच्या कृपेने, माझ्या मार्गदर्शनामुळे बरोबर आईवडिलांची पुण्याई आणि मुलांचे अथक परिश्रम आणि अभ्यास यातून आज दोघेही स्थिरस्थावर झाल्याचे पाहून मनाला एक वेगळाच आनंद लाभतो..!

राजकारण आणि शेती या दोन्हीही गोष्टीतून मुलांना वेळ देणं शक्य होत नसल्यामुळे आणि दोन्ही मुलांना राजकारणापासून लांब ठेवायचे अस ठरवलं असल्याने त्यांना लहानपणापासून बाहेर शिक्षणासाठी ठेवले.आता नातू युगवेंद्र ही अगदी पहिलीपासून शिक्षणासाठी बाहेर आहे..! काका यापुढे सांगतात कि,यामुळेच कदाचित माझी दोन्ही मुले डॉक्टर आणि वकिली या पेशामध्ये यशस्वी झाल्याचे दिसतात. वकिल विरधवल याने उच्च शिक्षण लंडन मधील प्रतिष्ठित University College London,Faculty of Laws मधून पदव्युत्तर पदवी ग्रहण केली आहे याचा सार्थ अभिमान वाटतो..!* मुलांच्या बरोबर काकांनी पुतणे डॉ कुलदीप, जयदीप आणि अमरदिप यांनीही दर्जेदार शिक्षण घ्यावे यासाठी प्रयत्न केले..! *

आजपर्यंत च्या प्रवासात राजकीय आणि सामाजिक जिवनात वावरत असताना माझी पत्नी सौ पद्मजा चेही तितकच योगदान आहे हे आवर्जुन सांगावेसे वाटते..!*

(राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजीदुपारी १२.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे येथे संपन्न होणार आहे.)

काकांच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात माहिती..!

सौ पद्मजा प्रमोद काकडे, जेष्ठ सुपुत्र डॉ सौरभ दंतचिकित्सक,स्नुषा डॉ प्राजक्ता त्वचारोग तद्न्य,ॲड विरधवल मुंबई हायकोर्ट,स्नुषा जान्हवी नातू युगवेंद्र आणि नात इरावती असा काकांचा परिवार आहे..!

✍️शब्दांकन – श्री चंद्रजित काकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed