डॉ सौरभ प्रमोद काकडे ( देशमुख ) अभिष्टचिंतन..! १७ डिसेंबर
निंबुत,बारामती
स्व भगवानराव यशवंतराव काकडे अर्थात भगवानदादा यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती प्रमोदकाका काकडे यांचे जेष्ठ सुपुत्र डॉ सौरभ प्रमोद काकडे यांचा उद्या १७ डिसेंबर ला चाळीशीत प्रवेश करत आहेत. सर्वप्रथम तळागळातील उपेक्षित अन गोरगरीब जनतेची निःस्वार्थ सेवा करणारा अवलिया,समाजसेवेचा वसा अर्थात सहकारमहर्षी कुटुंबियांकडून मिळालेला च आहे पण त्यांचे काका असणारे महाराष्ट्र राज्याचे मा महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या तालमीत तयार झालेले डॉक्टर सौरभ भैया यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!
आज कालचे लोकप्रतिनिधी, राजकारण करणारे नेते मंडळी प्रसिद्धी साठी सोशल मीडिया चा वापर करतात परंतु प्रसिद्धी पासून अलिप्त असणारे सहकारमहर्षी भगवानदादा काकडे देशमुख कुटुंबीय. अलिप्त म्हनण्यापेक्षा प्रसिद्धी पासून लांब असलेले परंतु समाजकार्यात अग्रेसर असणारे हे कुटुंब अगदी शेखरभैया,प्रदिपकाका, प्रमोदकाका गोरगरिबांच्या अडचणीत धावून जाणारे कुटुंब म्हणून त्यांची ओळख, दवाखाना,पोलीस स्टेशन अशा बाबतीत सर्वोतोपरी मदत ते करत असतात..!
त्यांचीच री ओढत डॉ कुलदीप भैया, सरपंच अमरभैय्या आणि डॉ सौरभ भैया हेही समाजसेवेत नेहमीच आघाडीवर असतात अर्थात कसलाही गाजावाजा न करता हे विषेश हे सर्व मी गेली कित्येक वर्षे जवळून पाहत आलो आहे..!
डॉ सौरभभैय्या यांनी गेल्या पाच वर्षात अनेक अपंग, विधवा कुटुंबियांना घरकुल मिळण्यासाठी वैयक्तिक रित्या कागदपत्रामध्ये लक्ष घालून पंचायत समिती मध्ये हेलपाटे घालून घरकुल मिळवून दिली. त्याचबरोबर २०२१ साली जवळजवळ १२५ लोकांचे घरकुला साठी लागणारे जॉबकार्ड ची विशेष मोहीम राबवली त्यातील बऱ्यापैकी यावर्षी त्यांची घरकुले मंजूर झाली आणि बांधून पूर्ण ही झाली यासाठी त्यांना काकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावातील गरजू गरीब कुटूंबातील अनेक आजारी असणाऱ्या आणि दररोज गोळ्या चालू असणाऱ्या लोकांना प्रमोदकाका फॉउंडेशन च्या माध्यमातून मोफत गोळ्या औषध वाटप चालू आहे..!
यांचबरोबर भैया काका विचार मंच च्या माध्यमातून दुर्धर आजार असणाऱ्या,अपघात झालेल्या, मयत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना, लहान मुलांना असणाऱ्या गंभीर आजारांना, कॅन्सर रुग्णांना आर्थिक स्वरूपात मदत केलेली आहे.
सौरभ भैया हे शौर्य ग्राम पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.शौर्यग्राम पतसंस्था ची २०१६ साली स्थापना करून होतकरू तरुणांना या माध्यमातून गेली दहा वर्ष झाली उद्योगधंदा चालू करण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. अशाच प्रकारे महाराष्ट्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व गरीब रुग्णांना पतसंस्थाच्या माध्यमातून मदत केली जाते..!
प्रसिद्धी पासून अलिप्त असणाऱ्या डॉ सौरभ यांना वाढदिवसाच्या पुनःश्च हार्दिक शुभेच्छा..!
