वडगांव निंबाळकर पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन..!
वडगांव निंबाळकर
वडगाव निंबाळकरपोलीस स्टेशन, च्या वतीने परिसरातील नागरिकांना घरफोडी/चोरी प्रतिबंधासाठी आवाहन
१) मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँक लॉकरचा वापर करा.घर बंद ठेवताना शेजारी व स्थानिक पोलिसांना कळवाएखादा दिवा/लाइट चालू ठेवा.
२) इमारतीच्या प्रवेशद्वारावर नाईट व्हिजन CCTV लावा वकिमान १५ दिवस रेकॉर्डिंग ठेवा.पोलीस
३) नोकर, ड्रायव्हर, वॉचमन यांची पोलिस पडताळणी करूनचकामावर घ्या तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, केबलवाले,कुरिअर इ. यांची ओळख पटवूनच घरात प्रवेश द्या.
४) अनोळखी व्यक्तींना आर्थिक व्यवहार किंवामौल्यवान वस्तूंबाबत माहिती देऊ नका.
५) संशयास्पद हालचाल, व्यक्ती गावात वाडीवस्ती वरदिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या.
६) घराजवळ रात्री पुरेसा प्रकाश राहील याची काळजी घ्या.सध्या कडाक्याची थंडी असल्याने घरा बाहेरील पशुधन(शेळी,बोकड, गाय) सुरक्षित ठिकाणी बांधा.
७) डुप्लिकेट चावी सहज मिळेल असे कुलूप वापरू नकामुख्य दरवाजावर मजबूत सुरक्षा लावा.
८) सोशल मीडियावर प्रवासाची माहिती पोस्ट करू नका.
९) स्थानिक पोलिस स्टेशन, बीट अधिकारी व मार्शलचे नंबरमोबाईलमध्ये सेव्ह ठेवा..!
संपर्क – 112/7517892674
