संगमनेर ला पुन्हा रेल्वे यावी यासाठी आ सत्यजित तांबे यांचेकडून विशेष मोहीम..!
संगमनेर
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुणे नाशिक रेल्वे नविन मार्गाची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी जाहीर केली हा मार्ग पूर्वी होणाऱ्या मार्गाच्या पूर्णपणे वेगळा आहे. पूर्वीचा मार्ग मा कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आ सत्यजित तांबे यांच्या अथक प्रयत्नातून संगमनेर मार्गे जाणार होती परंतु Gmrd चा नविन प्रकल्प जुन्नर याठिकाणी होतोय आणि त्यासाठी हा मार्ग बदलण्यात आल्याची सांगण्यात आले.
यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे, QR कोड स्कॅन करून केंद्राला ई-मेल पाठविण्याची. जुना पुणे नाशिक जुन्या मार्गेच व्हावी यासाठी त्यांच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे..!
