शेतकरी कृती समितीच्या लढ्याला यश, FRP रकमेवरील व्याज सभासद खाती वर्ग..! सतिशभैय्या काकडे
निंबुत, बारामती
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२२ ते २०२४ या तीन गाळप हंगामांतील FRP रक्कम आणि विलंबाचे व्याज अखेर सभासदांच्या खात्यावर जमा झाले असून, या संपूर्ण यशाचे श्रेय शेतकरी कृती समितीच्या लढ्याला आहे, कारखान्याच्या चेअरमनला नाही, असा ठाम आरोप शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री. सतिश काकडे यांनी केला आहे..!
FRP कायद्यानुसार उस तुटल्यापासून १४ दिवसांत FRP देणे बंधनकारक असून विलंबित रकमेवर १५% व्याज द्यावे लागते. मात्र सोमेश्वर कारखान्याने मागील तीन-चार वर्षांत बेकायदेशीरपणे कमी रक्कम दिल्याचा आरोप त्यांनी केला..!शेतकरी कृती समिती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या याचिकेनंतर मा. हायकोर्टांनी FRP एकरकमी देण्याचा आणि १५% व्याजासहित देण्याचा आदेश दिला. या आदेशाच्या भीतीनेच कारखान्याने व्याज जमा केले असून, तेही अर्धवट असल्याचा दावा शेतकरी कृती समितीकडून करण्यात आला आहे..!
शेतकरी कृती समितीने उर्वरित व्याज मिळवण्यासाठी ८ डिसेंबर रोजी हायकोर्टात सुनावणी घेणार असल्याची माहिती देत, चेअरमननी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी आणि सर्व बाबींचा खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या सभेस मा. अजितदादा पवार यांच्यासह सर्व संबंधित मान्यवरांना बोलवावे, अशीही मागणी करण्यात आली..!
