सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक स्व मुगुटरावआप्पा काकडे आणि लोकनेते स्व बाबालाल काकडे यांच्यानंतर सलग बारा वर्षे पुरुषोत्तमदादा चेअरमन पदी..!

0
IMG_20251128_080927

सोमेश्वरनगर,बारामती

बारामती तालुक्यातील अग्रगन्य असणारा आणि नावलौकिक मिळवलेला कारखाना म्हणून श्री सोमेश्वर कारखाना राज्यात नाही तर देशात ओळखला जातो. सहकारमहर्षी मुगुटरावआप्पा काकडे आणि लोकनेते बाबालाल काकडे आणि तत्कालीन सहकारी यांनी १९६२ साली कारखान्याची स्थापना केली. तदनंतर कारखान्याचे चेअरमन म्हणून संस्थापक अध्यक्ष स्व आप्पांनी १९६२ ते १९७७ अशी सलग पंधरा वर्षे कारखान्याची धुरा संभाळाली..!

१९७७ ते १९९२ अशी सलग १५ वर्षे लोकनेते स्व बाबांनी कारखान्याची धुरा यशस्वी पणे सांभाळली.परंतु सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष म्हणजेच सहकारमहर्षी कुटुंबियांचे भाचे असलेले पुरुषोत्तमदादा जगताप हे गेली ४२ वर्षे सोमेश्वर कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्या एवढा अनुभवी संचालक कदाचित महाराष्ट्रात कोणीही नसेल अर्थात नसावा. यामध्ये त्यांच्या कर्तृत्वात आणखी एक भर म्हणजे आप्पा आणि बाबांच्या नंतर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सलग बारा वर्षे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पद भूषविण्याचा त्यांना सन्मान मिळाला..! २०१३ साली अध्यक्ष पद मिळाल्यानंतर १२ वर्षात कारखान्याला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि सोमेश्वर ची प्रगती व आलेख ही दिवसेंदिवस दादांच्या नेतृत्वाखाली वाढत असल्याचे दिसत आहे. सोमेश्वरनगर परिसरात सभासदांची आणि बाजारपेठेची कारखान्यामुळे भरभराट झाल्याचे आपणास पहावयास मिळते..!

*खरं तर २०१२ सालची सोमेश्वर कारखान्याची परिस्तिथी आणि पुरुषोत्तम दादांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षात सोमेश्वर कारखान्याचा गुणवत्ता पूर्ण विस्तार अधोरेखित होतो.सोमेश्वर कारखाना नव्हे तर आता सोमेश्वर उद्योग समूह झाला आहे..!*

*सलग ४२ वर्ष संचालक आणि सलग १२ वर्षे अध्यक्षपद,सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप..!

खरं तर हा मान नव्हे बहुमान आहे..!*

*दादांच्या शिरपेचात मानाचा तुरा*..!

*श्री सोमेश्वर माझा अभिमान माझा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed