सोमेश्वर कारखान्याने सन २०२५ – २६ गळीत हंगामातील पहिली उचल ३५००/- प्र. मे. टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी..! *श्री सतिशभैया काकडे*

0
InShot_20250519_145722178

सोमेश्वर नगर
सोमेश्वर कारखान्याने सन २०२५ -२६ या गळीत हंगामात पहिली उचल ३३००/- प्र.मे. टन जाहीर करून सभासदांची पुर्ण दिशाभुल केली आहे. वास्तविक उस गाळप झाल्यानंतर १४ दिवसात F.R.P देणे बंधनकारक असुन गेली ४ वर्ष चेअरमन यांनी स्वतःचा कायदा करून कायद्याची पायमल्ली केली आहे तसेच गेली ४ वर्ष सभासदांचे २ ते ३ महिने करोडो रूपये बिनव्याजी वापरायचे हाच चेअरमन यांचा कारभार आहे. वास्तविक संघटनेच्या F. R.P एक रक्कमी मिळणेच्या न्यायालयीन लढाईला यश आल्याने महाराष्ट्रातील कारखान्याना F.R.P एक रक्कमी द्यावी लागली हे त्यांचे श्रेय असुन चेअरमन यांनी F. R.P एक रक्कमी दिल्याचा आव आणु नये जर सभासदांच्यावर प्रेम होते तर गेल्या ४ वर्षात F.R.P एक रक्कमी का दिली नाही याचा खुलासा करावा. वास्तविक सोमेश्वरची रिकव्हरी सांगली, कोल्हापुर जिल्हयातील कारखान्यांच्या तोडीची असल्याने त्या कारखान्याप्रमाणे ३५००रू प्र.मे.टन पहिली उचल का दिली नाही याचा चेअरमन यांनी प्रथम खुलासा करावा. तसेच साखरवाडी या खाजगी कारखान्याशी तुलना करू नये.
तसेच गेल्या ४ वर्षामध्ये F. R.P विलंबाने दिल्याने सुमारे ६ ते ६.५० कोटी रूपये व्याज सभासदांना मिळण्याकरीता मी न्यायालयीन लढाई लढत असुन कारखान्यास व शासनास नोटीसा गेलेल्या आहेत. त्यासंबंधीची अंतिम तारीख ८/१२/२०२५ रोजी असुन यामध्ये लवकरच तमाम उसउत्पादक सभासदांना न्याय मिळेल अशी मी कृती समितीच्या वतीने ग्वाही देतो. यासंबंधी दि. ३०/१०/२०२५ रोजी निंबुत येथील शेतकरी मेळाव्यातील कार्यक्रमात अजितदादा यांच्या समोर मी F.R.P व्याज मिळणे बाबत न्यायालयात दाद मागीतली आहे असे सांगीतले होते. तसेच चालु हंगामातील F.R.P देखील एक रक्कमीच मिळावी अशी मागणी कृती समितीच्या वतीने केली होती यावेळी चेअरमन आपण स्वतः व बहुतांश संचालक मंडळ देखील उपस्थित होते हे आपण विसरलात काय? त्यामुळे याचे श्रेय कृती समितीस आहे आपण घेवु नये.कारखान्याकडे मागचे मालतारणावरील कर्ज नसल्याने तसेच बगॅस विकी, साखर विकी, वीज,विकी, इथेनॉल, अल्कोहोल विकी यामधुन पैसे मिळत आहेत त्यामुळे कारखाना ३५००/- रूपये पहीली उचल एक रक्कमी सहज देवु शकतो. चेअरमन यांनी वर्तमान पत्रामधुन साखरेवर २८९०/- रू पोत्याला उचल मिळते असे दिशाभुल करणारे वक्तव्य केले आहे. वास्तविक बँकेने ३६००/- रू
पोत्याला मुल्यांकन केल्याने ९० टक्के उचल म्हणजे ३२४० /- रू कारखान्याला पोत्याला मिळत आहे.

तसेच मागील वर्षी ३४००/- अंतिम दर देत असताना १२ लाख ५० हजार पोत्याचे मुल्यांकन ३६२३ /- रू केले होते. प्रत्यक्षात आज मितीस त्या साखर पोत्याची विकी ३७२५/- रू प्रतिक्किंटल पेक्षा जास्त झाल्याने सुमारे १२ कोटी ५० लाख रूपये कारखान्यास जादा मिळालेले आहेत.त्यामुळे मागील वर्षीचा दर सुध्दा ३५५०/- चे आसपास बसु शकत होता हे सिध्द झाले. त्यामुळेचेअरमन यांनी सभासदांना किती न्याय दिला हे दिसते!चेअरमन यांच्या आडमुठी धोरणामुळे कदाचित त्यांचा सभासदांवर विश्वास नसल्यामुळे मागणीनसताना त्यांना चालू गळीत हंगामात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात अनुदान जाहीर करावे लागलेआहे. मगील काळात कारखाना एप्रिल, मे मध्ये गाळप सुरू असताना चेअरमन यांनी किती अनुदानदिले हे सभासदानां माहीत आहे. कदाचित त्यामुळेच सोमेश्वरला सभासद उस देणार नाहीत याभितीपोटी अनुदान जाहीर करण्याऐवजी ३५००/- पहीली उचल जाहीर केली असती तर अनुदानाचाखर्च कारखान्यावर पडला नसता व जादा उसही कारखान्यास मिळाला असता.तरी कारखान्याने तात्काळ १० डिसेंबर चे पंधरवडा बील ३५००/- रू प्र.मे.टन प्रमाणे रक्कमसभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावी असे आवाहन शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिशभैय्या काकडे यांनी केले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed