महाराष्ट्र ग्रामीण बँक,करंजेपुल शाखेचा उद्घाटन समारंभ बँकेचे महाव्यवस्थापक भामरे सो, जिल्हा परिषदेचे मा सभापती प्रमोदकाका काकडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा गट) बारामती तालुका अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे यांच्या हस्ते संपन्न…!!!
सोमेश्वरनगर, बारामती
महाराष्ट्र ग्रामीण बँक,करंजेपूल या शाखेचा उद्घाटन समारंभ आजरोजी पार पडला. या प्रसंगी बँकेबद्दल माहिती देताना बँकेचे महाव्यवस्थापक श्री. भामरे सरांनी सांगितले की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही संपूर्णपणे शासकीय मालकीची श्येडुल्ड बँक असून अत्याधुनिक CBS प्रणालीद्वारे NEFT/RTGS, UPI, Mobile Banking, Internet Banking, CTS clearing, Rupay Debit card, Platinum ATM card इ. सर्व सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात. त्यासोबतच बँकेत आकर्षक व्याज देणाऱ्या विविध ठेव योजना असून बँकेतर्फे विविध आकर्षक कर्ज योजनांद्वारे शेतकरी, उद्योजक, व्यापारीवर्ग, नोकरदार वर्ग, बचत गट इत्यादींना पतपुरवठा केला जातो आणि पात्र खातेदारांना सर्व शासकीय योजनांचा लाभ दिल्या जातो. बँकेच्या महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 750 शाखा असून सप्टेंबर 2025 अखेर रू.42000 कोटी इतक्या एकूण व्यवसायाचा टप्पा बँकेने पूर्ण केलेला आहे. त्यामुळे करंजेपूल गावातील आणि परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांनी बँकेत त्वरित आपले खाते उघडून उत्तम ग्राहकसेवा प्रदान करण्याची संधी बँकेस द्यावी अशी विनंती आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. भामरे सरांनी केली.
उद्घाटन कार्यक्रमास बँकेच्या पुणे क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. गिरीश चिवटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे, मा.सभापती प्रमोदकाका काकडे, संचालक संग्राम सोरटे, संचालक अभिजीत काकडे, संचालक ऋषिकेश गायकवाड, डॉ.मनोज खोमणे, सरपंच भाऊसाहेब हुबरे, संतोष कोंढाळकर, संतोष गायकवाड, शिवाजी शेंडकर, रूपचंद शेंडकर, सुनिलआबा भोसले, स्वप्निल गायकवाड आदी मान्यवर तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करंजेपूल शाखेचे व्यवस्थापक श्री. संदीप कानगुडे, कार्यालयीन सहाय्यक श्री. प्रतीक डोंबाळे, श्री. मयूर लेंढे, श्री. सागर जगताप आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. अजिंक्य धुरगुडे यांनी केले.
