सोमेश्वर कारखान्याचे अंतिम बिल सभासदांच्या बँक खाती वर्ग…!!!

0
IMG-20250701-WA0004

सोमेश्वरनगर,बारामती

गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी कारखान्याकडे गळीतासाठी पुरविलेल्या ऊसाचे अंतिम बील रु.२२६/- प्रती टन प्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणेत आलेले आहे. त्याचप्रमाणे पुर्व हंगामी ऊसासाठी रु.७५/- व सुरु व खोडवा ऊसाकरीता रु.१५०/- प्र.टन याप्रमाणे अनुदानाची रक्कम सभासदांच्या खात्यावर यापुर्वीच जमा करणेत आलेली आहे. अनुदानाची रक्कम विचारात घेता कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना पुर्वहंगामी ऊसासाठी रु.३४७५/- व सुरु आणि खोडवा ऊसासाठी रु.३५५०/- प्रती टन याप्रमाणे अंतिम ऊस बील आदा करणेत आलेले आहे. प्रती टन रु.२२६/- प्रमाणे निघणारी रक्कम सुमारे रु.२५.०० कोटी आज रोजी सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे.

                    त्याचप्रमाणे सभासदांच्या कारखान्याकडे असलेल्या ठेवी वरील व्याजाची रक्कम सुमारे रु.४.०० कोटी बँक खातेवर जमा करणेत आलेली आहे. तसेच सदर हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या गेटकेन ऊस उत्पादकांसाठी अंतिम ऊस बील रु.२६/- प्रमाणे त्यांचे बँक खात्यावर

जमा करणेत आलेले असून गेटकेन धारकांना एकूण रु.३२००/- प्र.टन प्रमाणे अंतिम दर देणेत आलेला आहे. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील बिगर सभासद व उत्पादक सभासद यांनी पुरविलेल्या ऊसासाठी अनुदानासह रक्कम रु.३४५०/- आणि गेटकेनसाठी रु.३२००/- प्रमाणे संपुर्ण रक्कम आज रोजी अदा केलेली आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed