*सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत सर्वाधिक १२ विषयांना मंजुरी‌…!!! सोमेश्वर कारखान्याची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण तब्बल सात तास चालली…!!!*

0
IMG-20250930-WA0001

सोमेश्वरनगर.

    सोमेश्वर सह.साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सिरपपासून इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी यंत्रसामग्रीमध्ये बदल करण्यास,सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस तसेच गोदाम दुरुस्तीस मंजूरी देण्यात आली. त्यामुळे दीड लाख क्विंटल साखर पोती क्षमतेचे गोदाम होणार आहे.दरम्यान अंतिम ऊसदरात वाढ करून सभासदांची दिवाळी गोड होण्यासाठी अनेक सभासदांनी मागणी लावून धरली.सभासदांचा विशेषतः तरुण वर्गचा वाढता सहभाग हा लक्षणीय होता.सर्व विषयांना सभासदांनी चर्चा करून मंजुरी दिली...!!!
        बारामती तालुक्यातील सोमेश्वर सह.साखर कारखान्याची ६१ वी बार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दि २९/०९/२०२५ ला कारखान्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणामध्ये पार पडली. या वेळी अध्यक्षस्थानी सोमेश्वर चे चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप होते. यावेळी विविध विषयांवर सभासद आणि संचालक मंडळामध्ये विस्तृत चर्चा झाली. दिवसभर खेळीमेळीत सुरू असलेली सभा रात्री मात्र सतिशभैया बोलायला उठले त्यावेळी त्यांचा माईक बंद केल्याने सायंकाळी ८ वाजता गोंधळात संपली. सभेत अनेक सभासदांनी मुद्देसुद  महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.

या वेळी प्रमोदकाका काकडे, सतिशभैया काकडे, शहाजीकाका,विजयकुमार सोरटे, सतीश खोमणे, दिलीपदादा फरांदे, राजवर्धनदादा शिंदे, संभाजीनाना होळकर, अभिजितभैया काकडे,भाजप नेते दिलीपआप्पा खैरे, पी के जगताप, तसेच योगेश भोसले, विक्रमआप्पा भोसले, कल्याणबापू जगताप,गणेशआप्पा फरांदे यांच्यासह सभागृहात सभासद व संचालक मंडळ उपस्थित होते…!!!
सभागृहात बोलताना प्रमोदकाका काकडे यांनी सभासद नसणाऱ्या आणि कारखान्यात ऑर्डर दिलेल्या कामगार भरतीची यादी गतवर्षी च्या वार्षिक सभा झाल्यानंतर मागितली होती परंतु कारखाना व्यवस्थापनाने अद्याप पर्यंत ती माहिती दिली नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली. विक्रम भोसले, शिवाजी शेंडकर,निलेश गायकवाड यांनी मंगल कार्यालय उभारणी आणि ऐच्छिक आरोग्यविमा राबविण्याची मागणी केली. राजेंद्र जगताप यांनी ताळेबंदावर सखोल अभ्यासपूर्ण विवेचन करून अधिकचा भाव कसा बसवता येऊ शकते याची आकडेमोड सभागृहात मांडली.त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना फायनान्स चे योगेश नांदखिले यांनी उत्तरे दिली. ॲड तानाजी गायकवाड, रमाकांत गायकवाड, रूपचंद शेंडकर, बुवासाहेब हुंबरे, मधुकर बनसोडे यांनी निंबुत छपरी येथे चार एकर कारखान्याची स्वमालकीची जागा आहे ती कार्यालयासाठी उपयुक्त ठरेल अशी सूचना मांडली.तसेच करंजे भागशाळेची सुधारणा करण्याची मागणी केली. राजेंद्र जगताप यांनी, साखर मूल्यांकन माळेगावप्रमाणे ३९०० धरा आणि ऊसदर वाढवा,अशी मागणी केली. यावर कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी यावर उत्तर देत खुलासा केला…!!!
धैर्यशील काकडे यांनी पेट्रोल पंप उधारी देणे बंद करावे असे मत मांडले. तसेच संचालकांच्या भत्या बाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर पुरुषोत्तम जगताप यांनी साखर संचालक मंडळाच्या बैठकीत यावर विचार करू असे सांगितले.
भाजप नेते दिलीप खैरे,राजेंद्र जगताप,पी.के.जगताप,योगेश भोसले, केतन भोसले,राजेंद्र लकडे,शंकर दडस,दत्ताञय भोईटे आदींसह अनेक सभासदांनी प्रतिटन ३ हजार ४०० रुपये ऊसदर अमान्य करत आणखी २०० रुपये वाढविण्याची मागणी केली…!!!

              प्रमोदकाका काकडे यांनीही गतहंगामापेक्षा यंदा १७१ रुपये दर कमी दिल्याचा प्रश्न उपस्थित केला यावर पुरुषोत्तम जगताप म्हणाले, इतर कारखाने  दर बसवतात. आपण नियमानुसार साखर मूल्यांकन ३ हजार ६२३ रुपये धरले आहे त्याप्रमाणे आर्थिक हिशोब पत्रकानुसार आपण दर दिल्याचे सांगितले.

               कांचन निगडे यांनी सोमेश्वर शिक्षण संस्थेची पुरंदरमध्ये भाग शाळा सुरू करण्याची मागणी केली. तसेच गणेश फरांदे यांनी कारखान्याच्या मालकीची अग्निशमन गाडी खरेदी करावी असा प्रस्ताव मांडला त्याला विक्रम भोसले यांनी अनुमोदन दिले...!!!

        सतीशमामा खोमणे यांनी कारखान्याचे करत असताना कारखाना कारखाना अहवालात संस्थापक संचालक यांच्या दिलेल्या फोटो वरून १९६० साली मुगुटराव आप्पा आणि सहकाऱ्यांनी  यांनी कारखाना सुरू केला तदनंतर १९६३ साली कारखान्याच्या पहिला गळीत हंगाम पार पडला यावेळी ५० रुपये दर होता अशी आठवण सांगितली तर पुढे १९६७ साली गुळाला भाव वाढल्याने त्यावेळी गाळपासाठी ऊस कमी उपलब्ध झाला असेही सांगितले.सुरुवातीला१००० प्रतिटन गाळप क्षमता असणारा कारखाना आज १०००० गेला असल्याचे सांगतांना विद्यमान चेअरमन ही गेली ४१ वर्षे संचालक असल्याचे त्यांनी सांगितले इतका प्रदीर्घ अनुभव असणारे कदाचीत ते एकमेव संचालक असावेत अस सभागृहाला सांगितले...!!!

      यावेळी दत्ताआबा चव्हाण,कांचन निगडे,बाळासाहेब गायकवाड,दत्तात्रय ढोले, प्रवीण सूर्यवंशी,नितीन सोरटे, गणेश मगर,प्रमोद वायाळ, भगवान गोफणे आदींनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला.नितीन यादव यांनी पुरस्कार प्राप्त शेतकरी सभासदांचे एकरी टनेज ची सविस्तर माहिती दिली,तसेच कालिदास निकम यांनी अहवाल वाचन केले, व्हाइस चेअरमन मिलिंद कांबळे यांनी आभार मानले...!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed