वाकी येथील समाज सामाजिक कार्यकर्ते अनिल भंडलकर यांचे ग्रामपंचायत वाकी येथे उपोषण..!
बारामती तालुक्यातील ,ग्रामपंचायत वाकी येथील सामाजिक कार्यकर्ते ,श्री. अनिल नारायण भंडलकर ,यांनी ग्रामपंचायतीकडे. गेल्या दोन वर्षातील मासिक सभा व प्रोसिडिंग सभाचे संपूर्ण वृत्त, आणि इतर वाड्यावर जो विकास झालेला आहे त्याची रकमेसह यादी,,, याची मागणी केली आहे .
परंतु त्यांना सदर माहिती मिळत नसल्यामुळे. त्यांना शेवटी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे. त्यांच्या या लढ्यास नक्की कितपत यश मिळत आहे. हे येणाऱ्या काळातच समजेल.
प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे मागणी केली जात आहे.
