मराठी बोला अन्यथा महाराष्ट्र सोडा, हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय,,.
मुंबई
गणेश फरांदे सहसंपादक
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णय पाठीमागील आठवड्यात मागे घ्यावा लागला होता,याच प्रश्नावर मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती,यावर निर्णय देताना मुंबई हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय देताना, असे सांगितले की, महाराष्ट्रात मराठी येत नाही ही सबब ऐकुन घेतली जाणार नाही.तुम्ही महाराष्ट्रात काम करत असताल तर मराठी येणं अत्यावश्यक आहे अन्यथा ती शिकावी लागेल…!!!
भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४५, महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम,१९६४ आणि कलम १६६ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे.यामुळे आता यापुढे महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाचं चालणार आहे.मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर सामान्य नागरिकांचा कायद्यावरचा विश्वास अजून भक्कम झाला आहे.आणि या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे…!!!
