सर्वसामान्य नागरिकांना आपलं वाटणार व्यक्तिमत्व समाजसेवक श्री गणेशआप्पा फरांदे…!!!

0
IMG-20250308-WA0161

निंबुत, बारामती

फरांदेनगर,निंबुत गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलं श्री गणेशआप्पा फरांदे, त्यांचा जन्म २७ जुलै १९७९ रोजी आंदोरी ता खंडाळा येथे झाला.वडील रामदास फरांदे,आई ताराबाई अत्यंत साधी माणसं,एक विवाहित बहिण आणि एक भाऊ,चांगल्या वाईट काळात भक्कमपणे पाठीशी असणाऱ्या त्यांच्या शिक्षिका पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा त्यांचा समृद्ध परिवार…!!!वडील सोमेश्वर कारखान्यात नोकरीस व घरी जेमतेम शेती अशी घरची परिस्थिती असताना गणेश आप्पा यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग चे शिक्षण माळेगांव कॉलेजला घेतले याबरोबरच लागलीच त्यांनी हिरो होंडा शोरुम बारामती, त्यानंतर पुणे याठिकाणी शिक्षण पूर्ण झाले की नोकरीही केली परंतु त्यांना स्वतःच काहीतरी छोटासा उद्योग असावा ही जिद्द शांत बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला…!!!

गावी आल्यानंतर त्यांना सुरुवातीला साथ लाभली ते निंबुत परिसरातील सहकाराला समृद्धी मिळवून देणारे,सहकार अभ्यासू संचालक मंडळ आणि कुशल कामगारांना घेऊन अल्पावधीत नावारूपास आलेली समता पतसंस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष श्री दिलीपदादा फरांदे यांची,त्यांच्याबरोबर अप्पांनी महालक्ष्मी हिरोहिंडा ची नीरा याठिकाणी प्रसन्न मोटर्स या नावाने सब डीलरशिप घेतली.दोन वर्षे जोमाने धंदा वाढत चालला होता परंतु काही माणसं समजात अशी सगळीकडेच असतात ज्यांनी या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला त्यामुळे गणेश आप्पा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला…!!!

हा निर्णय त्यांनी खूप जड अंतःकरणाने त्यांनी घेतला होता वडील निवृत्त झाले होते,बहिणीचे लग्न,भावाचे शिक्षण त्यात त्यांची नोकरी गेली होती अशा तणावपूर्ण परिस्थितीत त्यांनी महालक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा त्यांचे मित्र, मार्गदशक सचिनशेट सातव आणि नितिनशेठ सातव यांची भेट घेऊन नवीन हिरो ची सब डिलर शिप आणि सराफ होंडा ची ही सब डिलर शिप घेतली आणि आपला नवीन व्यवसाय सुरु केला. अल्पावधीतच लोकप्रिय करून दाखवला,त्याचं वैष्णवी होंडा या नावाने नगर सातारा बायपास रोडला निरा याठिकाणी सेल्स आणि सर्व्हिस च नामांकित शोरुम आहे.ते सध्या एक यशस्वी उद्योजक आहेत. होंडा कंपनी च्या युनिकॉर्न, शाईन, एक्टिवा, डिओ इ यासारख्या नवीन गाड्या विक्रीला उपलब्ध असतात…!!!

याबरोबर त्यांनी त्यांचे समाजकारण ही सुरू ठेवले अत्यंत हजरजबाबी असणारे आप्पा विनोदी स्वभावाचे आहेत, त्यांचा हळवा स्वभाव मात्र या चेहऱ्यामागे ते कायमच लपवून ठेवतात.त्याचे कारणही तसेच आहे…!!! आपल्या आईवडिलांवर प्रचंड प्रेम असणारे अप्पा राजकारणात मात्र थोडक्यात अपयशी ठरले,२०२१ साली झालेल्या निंबुत ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या तीन मतांनी पराभव झाला हाच पराभव त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या जिव्हारी लागला…!!!

खरं तर त्यांनी त्यांच्या वॉर्ड मध्ये कोणतेही पद नसताना ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकोपयोगी योजना घराघरात पोहचवल्या आहेत.त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील अशी एकही व्यक्ती सापडणार नाही ज्यांना DBT तसेच इतर लाभ मिळाले नाहीत,हे सर्व त्यांना शक्य झाले ते प्रमोदकाका काकडे,सतिशभैया काकडे आणि सविताकाकी काकडे यांच्या माध्यमातून.तरीही त्यांचा मोठा लोकसंग्रह कमी झाला नाही असे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे अप्पा सांप्रदायिक क्षेत्रात भजनी मंडळात ही सक्रीय आहेत. कौटुंबिक जबाबदारी,मित्रमंडळी, पाहुणेरावळे, व्यवसाय,सांप्रदायिक या सर्व जबाबदाऱ्या लीलया पार पाडतात…!!!

अशा या दिलखुलास,हसतमुख सातारी कंदी पेढ्यासारख्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!!आप जियो हजारो साल,साल के दीन हो पचास हजार…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed