*लाडक्या बहिणींना मिळणार आता बिनव्याजी कर्ज,महायुती सरकारची रक्षाबंधन च्या मुहूर्तावर नवी योजना…!!!*
मुंबई
महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू करून एक वर्ष पूर्ण होत आहे.ही योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली आहे. रक्षाबंधन च्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना अजून एक खुशखबर दिली आहे. लाडक्या बहिणींनी आता गृहिणी न राहता उद्योजिका बनावं यासाठी सरकारने पुढच पाऊल टाकलं आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण आता महायुती सरकारची लाडकी उद्योजिका होणार.या माध्यमातून सरकार लाडक्या बहिणींना ₹१० लक्ष रुपये पर्यंत बिनव्याजी देणार आहे,त्याचे व्याज मात्र सरकार भरणार आहे लाडक्या बहिणींना फक्त मुद्दल भरायची आहे.यासाठी आपण OBC महामंडळ,भटके विमुक्त महामंडळ,पर्यटन आयु महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यात बसत असाल तर आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे,परंतु तुमचा नियोजित व्यवसायाची तपासणी करून मग हे कर्ज मिळणार आहे.याचा उद्देश असा आहे की ज्या कारणासाठी आपण कर्ज घेताय त्याचा विनियोग हा लाडक्या बहिणींना घरी बसून उत्पन्न वाढीसाठी व्हावा ना की ते कर्ज इतरत्र वापरले जावे …!!!
ज्या बहिणी या निकषात बसणार आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे…!!! *कर्ज मिळवा आणि मालक व्हा*
