राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर,वाचा सविस्तर काय आहे निर्णय…???
मुंबई
महाराष्ट्र महायुती सरकारने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून अधिकृतरित्या या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.ही खुशखबर आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्टीय दिव्यांग निवृत्ती योजना या सर्व योजनांचे अनुदान पूर्वी ₹१५०० इतके होते त्यामध्ये महायुती सरकारने भरघोस वाढ केली आहे, आता ते ₹२५०० इतके पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे.
महायुती सरकारने लोकप्रिय योजनांचा धडाका लावला असून एकामागून एक असे लोकप्रिय निर्णय शासन घेताना दिसत आहे.याच अनुषंगाने अजून काही निर्णय येणार असून लवकरच असाच एक निर्णय महाराष्ट्रातील जनतेला सुखद धक्का देणारा असणार आहे.खरं तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अर्थात DBT या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे घरबसल्या थेट बँक खात्यावर जमा होत आहेत,त्यामुळे त्यांना या मिळणाऱ्या अनुदानासाठी कुठेही सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे घालावे लागत नाही.
या सेवा महायुती सरकारने चालू केल्यानंतर सर्वसामान्य जनता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रत्यक्ष रित्या मनोमन आभार मानत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत असल्याचे दिसते…!!!!

