फरांदेनगर,निंबुत येथे संत सावतामाळी महाराज जयंती उत्साहात साजरी…!!!
निंबुत
गणेशआप्पा फरांदे, सहसंपादक 9890039233
बारामती तालुका,, येथील निंबूत फरांदेनगर ,या ठिकाणी काल अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात श्री संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी झाली. त्याप्रसंगी निंबूत परिसरातील संप्रदायाचे सेवक, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प. दत्तात्रय फरांदे महाराज महाराज, यांनी श्री संत सावता माळी यांचे जीवन चरित्र त्यांच्या अभंगातून सांगितले,. आजच्या तरुणांना जीवन जगण्याची दिशा फक्त सांप्रदायाच देऊ शकतो ,, एक आनंदी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर साधुसंतांची शिकवण अlणि त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत , अशा शब्दात फरांदे महाराजांनी साधुसंतांच्या अभंगाचे महत्त्व पटवून दिले.
सर्वधर्मसमभाव, निर्व्यसनी जीवन आणि समाजात शांतता निर्माण करणे, ही काळाची गरज आहे, यासाठी संतांची शिकवण आचरणात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे महाराजांनी यावेळी सांगितले ,,त्यानंतर संपूर्ण परिसराला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते..या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी व तरुणांनी केले होते. याप्रसंगी परिसरातील सर्व भाविक भक्त, तरुण मंडळ व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…!!!
