ट्रिपल इंजिन सरकारची मोठी घोषणा…!!!आता अनुदान स्वरूपात मिळणार अधिकचे पन्नास हजार रुपये…
मुंबई
महायुती सरकार नव्याने येऊन आता आठ महिने झालेले आहेत. या सरकारने लोकप्रिय योजनांचा धडाका लावला आहे.नुकत्याच झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत गरीब कुटुंबातील नागरिकांना मिळणाऱ्या घरकुल योजनेत सरकारने अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.हे अनुदान आता पन्नास हजार इतके असणार आहे…!!!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास मंत्री यांच्या बैठकीत झालेला निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितला,यामध्ये पूर्वी घरकुलांसाठी राज्य सरकार ₹१,२०,००० देत होते, याबरोबर नरेगा मधून अतिरिक्त ₹२८,००० आणि शौचालय साठी ₹१२,००० असे एकूण ₹१,६०,००० नवीन घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना मिळत होते…!!!
यामध्ये आता सरकारचे अनुदान म्हणून ₹५०,००० अतिरिक्त मिळणार आहेत त्यामुळे ही रक्कम आता ₹२,१०,००० होणार आहे.यामुळे पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर बांधत असताना मदत होणार आहे…!!!
