उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या वतीने राष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे बारामती चे आयोजन…!!!
पुणे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती दरम्यान राष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेला शनिवार १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता शनिवारवाडा येथून रॅलीने सुरुवात होणार आहे,महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटिल, अण्णा बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
मुख्य स्पर्धा ही हडपसर(ग्लायडिंग सेंटर) येथून सतीश मगर,रोहित पवार,चेतन तुपे,दशरथ जाधव हे मान्यवर या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हा शनिवार दि १९ रोजी ग दि मा सभागृह बारामती येथे दुपारी २ वाजता पार पडणार आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद आबा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण मंत्री, राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार, आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत…!!!
ही स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ दरवर्षी ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करत असते त्यामुळे मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या राज्यातून सायकल स्पर्धक सहभागी होत असतात.त्यांचे स्वागत करण्यासाठी गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व सन्माननीय पदाधिकारी,तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे…!!!
