वर्धापन वर्ष साजरे करत असताना, ह्युंदाई कंपनीची क्रेटा बनली भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी एस यू व्ही गाडी…!!!
बारामती
नुकतीच भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत दाखल होऊन दहा वर्षे पूर्ण करत असलेली साऊथ कोरियन कार कंपनी ह्युंदाई ची क्रेटा ही एस यू व्ही ने विक्रम केला आहे.ह्युंदाई मोटार इंडिया लि. ची अल्टिमेट एसयूव्ही म्हणून नावारूपास आलेली ‘क्रेटा’ ही जून २०२५ मध्ये भारतात सर्वाधिक विकली गेलेली गाडी ठरली आहे. १५,७८६ क्रेटा गाड्या या महिन्यात विकल्या गेल्या. जानेवारी २५ ते जून २५ या पहिल्या सहामाहीच्या काळातही क्रेटा हीसर्वाधिक विकली जाणारी गाडी ठरलीआहे.
या कालावधीत मार्च, एप्रिल आणि जून अशा ३ महिन्यांत ही गाडी विक्रीच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर राहिली.क्रेटाच्या विक्रीच्या बळावर ह्युंडाईने भारतीय बाजारात ग्राहकप्रिय कंपनी होण्याचा मान मिळविला आहे. योगायोग म्हणजे क्रेटाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्ताने ही कामगिरी कंपनीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. यानिमित्ताने ह्युंडाई मोटार इंडियाचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी तरुण गर्ग यांनी सांगितले की, १२ लाख भारतीय परिवारांच्या दृष्टीने क्रेटा हे केवळ एक उत्पादन नसून एक भावना आहे.
मागील एक दशकापासून क्रेटा ही एसयूव्हीबाजारात आपला दबदबा कायम ठेवून आहे. कंपनीच्या भारतातील वृद्धीचा ती मोठा आधार बनलेली आहे. जून २०२५ मध्ये ‘बेस्ट सेलिंग मॉडेल’ ठरतानाच गाडीने भारतातील आपली १० वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वप्रथम २०१५ मध्ये क्रेटा या गाडीची पहिली आवृत्ती आली त्यामध्ये ह्युंदाई कंपनी भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांची गरज आणि आवड ओळखून दर दोन तीन वर्षांनी गाडीचा लूक आणि फेसलिफ्ट बदलत राहिली.यामुळे ती अधिकच लोकप्रिय होत गेली. मिडल रेंज मधील लोकप्रिय गाडी असण्याचा सन्मान ही क्रेटा या एस यू व्ही ला जातो…!!!
२०१५ मध्ये लाँच झालेली क्रेटा ही सुरुवातीपासूनच सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही राहिली आहे. ह्युंदाई इंडिया ब्रँडच्या भारतीय बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा असताना अग्रणी स्थानाचे ही एक ओळखच आहे…!!!
