सांगवी येथील पांडुरंग तावरे केवळ एक यशस्वी उद्योजक नाहीत, तर हजारो शेतकऱ्यांचे ऍग्रो टुरिझम जनक…!!!

0
IMG-20250710-WA0004

बारामती तालुक्यातील सांगवी गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले पांडुरंग तावरे. वडिलांची जेमतेम शेती होती, परंतु आर्थिक अडचणींमुळे शिक्षणासाठी त्यांना पुणे येथे स्थलांतर करावं लागलं. शिक्षणानंतर पर्यटन उद्योगात वीस वर्षं काम केल्यानंतर, त्यांनी स्वतःच्या गावात परत येण्याचा निर्णय घेतला.कदाचित त्यांचा हा निर्णयच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला आणि इथूनच सुरू झाला त्यांची भन्नाट कल्पना असलेल्या *अ‍ॅग्री टुरिझम* या कॉन्सेप्ट चा प्रवास …!!!”

शेतीला चालना हवी, पण नुसत्या,कष्टाने आणि सरकारी सबसिडीने नव्हे तर त्यांनी आपल्या वीस वर्षातील पर्यटन क्षेत्रातील अनुभवातून उत्पन्न शेतकऱ्यांना कसं अधिक मिळेल,हे शिकवलं पाहिजे या विचारातून त्यांनी २००५ साली *Agri Tourism Development Corporation* (ATDC) ची स्थापना केली…!!!पांडुरंग तावरे यांनी शहरातील लोकांच्या कोंदट वातावरणातून गावच्या मोकळ्या हवेचा अर्थात *गाव अनुभवण्याची* उत्सुकता ओळखली आणि शेती पर्यटन ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते, लोकांना शेतात बैलजोडी चालवणं, गावातली चूल-मातीची भाकरी खाणं, गाय-म्हशी पाहणं, विहिरीत पोहणं याचा अनोखा अनुभव हवा असतो आणि हाच अनुभव त्यांनी व्यवसायात रूपांतरित केला.यात त्यांना प्रचंड असे यश मिळाले…!!!

आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या ३६ जिल्ह्यांतील ५५० हून अधिक शेतकऱ्यांनी शेती पर्यटन सुरू केलं आहे. या सर्व शेतकऱ्यांचं एकत्रित उत्पन्न ₹५५ कोटींहून अधिक आहे. अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न ४ पटीनं वाढलं आहे…!!!एका दिवसासाठी ₹१२००, तर राहणं आणि जेवणासह ₹१८०० अशी टूर पॅकेजेस त्यांनी तयार केली. हे पॅकेज ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरले. यामुळे गावात रोजगार निर्माण झाला, स्त्रियांनी गृहउद्योग सुरू केले, तरुणांनी शेतीला तंत्रज्ञान जोडायला सुरुवात केली…!!!

पांडुरंग तावरे यांच्या या कामामुळे त्यांना ‘भारतातील अ‍ॅग्री टुरिझमचे जनक’ म्हणलं जातं. त्यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाने ‘शेती पर्यटन धोरण’ तयार केलं आणि ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शेतभेट अनिवार्य केली…!!!आज पांडुरंग तावरे केवळ एक यशस्वी उद्योजक नाहीत, तर संपूर्ण देशातील हजारो शेतकऱ्यांच्या आशेचा किरण आहेत…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed